धक्कादायक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू, कुठे घडली घटना ? वाचा…

टीम AM : राज्यातील बहुतांश भागात पाऊस जोरात पडत असल्याने नदी – नाले भरुन तुडुंब वाहत आहेत. अशातच एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नांदेड शहराजवळील झरी इथल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 6 ऑगस्टला घडली आहे. 

नांदेड शहरातले 5 जण या खाणीत पोहण्यासाठी उतरले होते, त्यापैकी तिघांना पोहता येत नव्हतं, यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काझी मोजमिल, आफन, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुझायल अशी मृतांची नावं आहेत. 

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असल्याचं, आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.