दुचाकीचा हफ्ता भरुन येताना अपघात : तरुणाचा मृत्यू

टीम AM : दुचाकीचा हफ्ता भरुन येताना अपघात झाल्याने अंबाजोगाईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 6‌ ऑगस्ट मंगळवारी घडली आहे. ही घटना परळीच्या घाटात घडली असून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव निलेश नेमीचंद महाजन‌ [रा. जैन गल्ली] असे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, निलेश महाजन‌ [ वय – 40] यांनी परळी येथून दुचाकीची खरेदी केली होती. दुचाकीचा हफ्ता भरण्यासाठी आज ते परळीला गेले होते. हफ्ता भरुन येताना परळीच्या घाटात त्यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत निलेश महाजन हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.