अभिनेत्री आयेशा झुल्काचा वाढदिवस ‌: बॉलिवूडला केले अलविदा, वाचा…

टीम AM : अभिनेत्री आयेशा झुल्का आठवतेय का ? 90 च्या दशकात या अभिनेत्रीने एकेकाळी मोठा पडदा गाजवला होता. आज आयेशाचा वाढदिवस आहे. 28 जुलै 1972 साली श्रीनगरमध्ये आयेशचा जन्म झाला होता. बॉलिवूडच्या काही आवडत्या अभिनेत्रींपैकी असणाऱ्या आयेशाने खूप लवकर बॉलिवूडला अलविदा केले. 2003 साली एका प्रसिद्ध व्यवसायिकाशी लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला. मात्र, लग्नानंतर तिने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने स्वतः या निर्णयाविषयी सांगितले होते.

आयेशा आणि बिझनेस टायकून समीर वशी यांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर तिने सिने इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केले. मात्र अभिनेत्रीने आई होण्याचा निर्णय का घेतला, याचा खुलासा स्वतः तिनेच एका मुलाखतीत केला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने असे म्हटले होते की, तिला मूल नको होतं कारण तिला तिचा संपूर्ण वेळ आणि ऊर्जा समाजसेवेसाठी खर्च करायचं होतं. अभिनेत्री पुढे म्हणते की, माझी अशी इच्छा असते की माझा निर्णय माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी योग्य ठरेल. मी स्वतःला नशीबवान समजते की मला समीर यांच्यासारखे पती मिळाले आहेत. समीर यांनी माझा असाच सांभाळ केला जसं मला हवं होतं. माझ्यावर कधी कोणता दबाव टाकला गेला नाही, माझ्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान केला गेला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आयेशाने ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’, ‘संग्राम’, ‘मासूम’ या सिनेमांमधून प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. आमिर खान याच्यासह तिचा ‘जो जीता..’ हा सिनेमा विशेष गाजला. दरम्यान अभिनेत्री 2018 साली ‘जिनियस’ नावाच्या सिनेमात दिसली होती. ज्यात तिने एका आईची भूमिका साकारली होती.