वारीत आलं दुखणं : अंबाजोगाईतील महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना ? वाचा… 

टीम AM : अंबाजोगाई शहरातील विवेकानंद नगर, परळी रोड परिसरातील उषा अशोक विर्धे यांचा आळंदी ते पंढरपूरच्या दिंडीत पायी वारीत असताना लोणंद जवळील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यू समयी त्या 64 वर्षांच्या होत्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुणे येथील डेक्कनच्या खंडोबा दर्शन दिंडी क्रमांक दोन मधून  उषा विर्धे, त्यांचे पती अशोक विर्धे आणि नातेवाईक हे आळंदी ते पंढरपूर या दिंडीमध्ये पाई वारी करत होते. माळशिरस येथे दिंडी आली असता त्यांना दुखणं आलं, त्यांना लोणंद येथील साई हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे पती अशोक विर्धे, दोन विवाहित मुलं, विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. 

श्रीयुत अशोक विर्धे जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. उषा विर्धे यांच्या पार्थिवावर अंबाजोगाई येथील रविवार पेठ परिसरातील बोरुळ तलावाच्या स्मशानभूमीत 14 जुलै रोजी रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक आणि नातेवाईक उपस्थित होते.