राज्यात 18 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस : या जिल्ह्यांना ‘हायअलर्ट’, वाचा… 

टीम AM : जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे. जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. 

[Advt.]

मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.