कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग
टीम AM : राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने परळीत मोठा भव्यदिव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, सकाळपासून दिवसभर धनंजय मुंडे यांनी हारतुरे, शाल, श्रीफळ असा कोणताही सत्कार स्वीकारला नाही. आपलं प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणलेले पुष्पहार व पुष्पगुच्छ त्यांनी नाकारत उलट आलेल्या प्रत्येकाचा त्यांनीच सत्कार केल्याचे बघायला मिळाले. आजच्या वाढदिवसादिवशी ही बाब लक्षवेधी ठरली.
ना. धनंजय मुंडे यांनी ‘नको हार नको सत्कार’ अशा पद्धतीने साधेपणाने आपल्या वाढदिवसादिवशी हजारो समर्थकांच्या शुभेच्छांचा साधेपणाने अतिशय आत्मियतेने स्वीकार केला. प्रत्येकाशी हस्तांदोलन, गळाभेट घेत आपले हे प्रेम व विश्वास हीच माझी ताकद आहे, हे कायम ठेवा, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सकाळी वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांसमवेत प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा व दर्शन घेतले. त्यानंतर परळीत आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी आपल्या समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मात्र, कोणाच्याही शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ, हारतुरे आदी सोपस्कारांना फाटा देत अतिशय साधेपणाने त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा साधेपणाने स्वीकारणे हे मात्र आज लक्षवेधी ठरले.
पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथची पूजा व आरती केल्यानंतर वैद्यनाथाचा आशीर्वाद व प्रसाद म्हणून त्यांनी प्रभु वैद्यनाथाच्या हाराचा स्वीकार केला. त्यानंतर वाढदिवसानिमित्तचा कुठलाही हार ,पुष्पगुच्छ व सत्कार धनंजय मुंडे यांनी स्वीकारला नाही. अतिशय साधेपणाने त्यांनी सर्वांच्या केवळ शुभेच्छा स्वीकारल्या.
कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग
धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले त्याला आज एक वर्ष झाले. मागील वर्षी आजच्या दिवशी त्यांनी वाढदिवस साजरा न करता कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर वाढदिवस बाजूला ठेवून खात्याचा आढावा घेतला होता. एक वर्षात त्यांनी इतके काम चांगले केले की दोनच दिवसापूर्वी त्यांना दिल्ली येथे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला. एका वर्षात धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य करून दाखवले. दरम्यान, नेहमीच कर्तव्याला प्रथम प्राधान्य देण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न दिसुन येतो. या वाढदिवसाला हारतुरे टाळत निखळ प्रेम व आत्मियतेच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांनी साधेपणा व एक वेगळेपण जपल्याचे दिसुन आले.
वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमातही पीकविम्यासाठी धडपड
विशेष म्हणजे आज एकीकडे धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जमलेली समर्थकांची अलोट गर्दी आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्यास मुदत वाढीसाठी प्रयत्न हे देखील लक्षवेधी ठरले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आज पिक विमा भरण्याचा अंतिम दिवस होता. मात्र, काही शेतकरी त्यापासून वंचित राहिल्यामुळे धनंजय मुंडे यांनी वाढदिवसाच्या गडबडीतही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून पिक विमा भरण्यास आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळवली आहे.