टीम AM : राज्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून विश्रांती घेतली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून रस्त्यावरील साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपुरात पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगराला पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगराला देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पुढील काही तासांतच कोकणाला देखील तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.