खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विजय चोरमारे यांचे व्याख्यान

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र – अंबाजोगाई व क्षितीज प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांच्या वतीने दि. 16 डिसेंबर 2019 वार सोमवार रोजी विजय चोरमारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

विजय चोरमारे हे मुंबई येथे महाराष्ट्र टाईम्स चे सहसंपादक असुन राजकीय व सामाजिक समिक्षक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी शरद पवार यांच्यावर अनेक लेख लिहिलेले आहेत. विजय चोरमाले हे “परिवर्तनाचे पाईक – शरद पवार साहेब” या विषयावर मागदर्शन करणार आहेत. अशी माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र – अंबाजोगाई व क्षितीज प्रतिष्ठान, अंबाजोगाईचे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी दिली.

हे व्याख्यान विलासराव देशमुख सभागृह, नगर परिषद बिल्डींग, अंबाजोगाई येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र – अंबाजोगाईचे अध्यक्ष अनिकेत लोहिया, उपाध्यक्ष दगडु लोमटे, सचिव डॉ.नरेंद्र काळे , माजी आमदार उषाताई दराडे अमर हबीब, अभिजित जोंधळे, मुजिब काझी, अंकुशराव काळदाते, रणजीत मोरे, विश्वास नरवडे, अशिष जाधव, गोविंद टेकाळे, पंडीत चव्हाण, कृष्णा सापते, रवी देशमुख, बालाजी शेरेकर, प्रमोद भोसले, अविनाश उगले, नेताजी सोळुंके, दत्ता सरवदे, हमीद चौधरी, विलास काचगुंडे, प्रदीप कात्रे यांच्यासह आदींनी केले आहे.