अंबाजोगाई : येथील कै. बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या दिव्यांग बांधवांचा प्रतिष्ठाणचे कार्यवाह सुरेंद्रनाना खेडगीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांचे आराध्य दैवत हेलन केलर, स्वामी रामानंद तीर्थ व कै. बेथुजी गुरूजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रतिष्ठाणचे कार्यवाह सुरेंद्रनाना खेडगीकर म्हणाले की, हेलन केलर यांचे विचार आत्मसात करून शारिरीक न्युनतेवर मात करून दिव्यांगांनी प्रगती साधावी व समाजाच्या विकासात योगदान द्यावे असा मौलिक संदेश दिला. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. आर. ए. चौधरी यांनी सुत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार श्रीधर काळेगावकर यांनी मानले. या कार्यक्रमास राजेंद्र घोडके, संजय चव्हाण, राजु चव्हाण, भारत पवार, पटेल, सुरवसे, ज्योतिराम घुले, गौतम खंडेराव, काझी, मधुकर बाभुळगावकर आदींची उपस्थिती होती.