जातीअंत संघर्ष समिती आक्रमक : ‘त्या’ हत्येचा केला निषेध

तीव्र निदर्शने करून उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

टीम AM : आसाममध्ये अल्पसंख्यांक समुदायातील 3 मुस्लिमांच्या हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेचा जातीअंत संघर्ष समितीचे कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दिनांक 9 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जातीअंत संघर्ष समिती, जिल्हा बीड यांच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आसाममध्ये अल्पसंख्यांक समुदायातील 3 मुस्लिमांच्या हत्या केल्या याबाबत तेथील राज्य सरकारने कोणतीही तातडीची कार्यवाही केली नाही. तसेच तामिळनाडू येथे पी.आर्मस्ट्राॅंग यांची त्यांच्या घरासमोर 5 जुलै 2024 रोजी हत्या करण्यात आली आहे. यात त्या त्या परिसर व राज्यातील धर्मांध सांप्रदायिक संघटना आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत, असे निवेदनात नमूद केले आहे. सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, राजाराम कुसळे, शेख बाबा, दत्ता काटे, शाहेद शेख, सुनिल वारकरी, सज्जू लाला, बापू गोमसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर निदर्शनात संतोष चव्हाण, सचिन गालफाडे, संतोष पवार, कान्होपात्रा माने, निकीता माने, सुनिता गोमसाळे, शेख फेरोज आदींसह अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवती व युवक सहभागी झाले.