टीम AM : शहरातील कुत्तरविहीर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी 8.30 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील कुत्तरविहीर परिसरात अतुल निकम [वय 24] हा युवक आईवडिलांसोबत राहत होता. तो उपजीविकेसाठी लाईट फिटींगचे काम करीत होता. मंगळवारी सायंकाळी त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल याने हे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, अंबाजोगाई शहर पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून ते अधिक तपास करीत आहेत.