टीम AM : सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे. इतकंच नाहीतर पर्यटक देखील अशा शांत निखळ वाहणाऱ्या धबधब्याचं रूप पाहण्यासाठी कायम उत्सुक असतात.
सध्या कोयनानगर मधील ओझर्डे धबधबा देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. तब्बल 350 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या दुधाळ धबधबा आणि कोयनेचे पावसाळी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोयनानगरला भेट देण्यासाठी येत आहेत.
सध्या कोयनेतील धोधो कोसळणारा पाऊस, धबधबे आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत असून हे निसर्गाचे रूप सर्वांनी पहावे, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.