रिल्स् बनवणे पडले महागात : एकाचा मृत्यू, बीड जिल्ह्यातील घटना

टीम AM : बीडमध्ये रिल्सच्या नादात एकाने जीव गमावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेल्फीच्या नादात थरारक अपघाताच्या घटना घडत आहेत. बीडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सेल्फीच्या नादात एकाचा जीव गेला, तर एक जखमी झाला आहे. 

दुचाकीवरून प्रवास करत असताना एक व्यक्ती रिल काढण्याचा प्रयत्न करीत असताना अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. धुळे – सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. दुचाकीवर मागे बसलेला तरुण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत असताना बाईक वेगात चालवत असलेल्या तरुणाने मागे वळून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत असताना त्यांचा अपघात झाला. हा व्हिडिओ सध्या ‘सोशल मीडिया’ वर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनिरुद्ध कळकुंबे [वय 25] असे मयत युवकाचे नाव आहे तर मधु शेळके [वय 30] असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. दोघेही गणेशपुरे, जालना येथील रहिवासी आहेत.