वाढदिवस विशेष : ‘या’ कारणामुळे वर्षातून 6 महिने आईसोबत एका घरात राहते सई, वाचा… 

टीम AM : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. आज 25 जून रोजी सई ताम्हणकरचा 38 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सईच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी…

सईने ‘हंटर’, ‘भक्षक’ या सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ती लवकरच ‘मटका किंग’ या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या सई तिच्या भूमिकांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. पण सई तिच्या आईसोबत राहत नाही. त्या दोघी वर्षातून केवळ सहा महिने एकत्र राहात असल्याचे स्वत: सईने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

आज सई जरी प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास जराही सोपा नव्हता. तिच्या या प्रवासात तिची आई कायमच सोबत होती. सईने जेव्हा मुंबईत आलिशान घर घेतले तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करित सर्वांना आनंदाची बातमी सांगितली होती. पण सईची आई तिच्यासोबत या घरात राहात नाही. सई ही मूळची सांगलीची आहे. तिने वयाच्या 19 व्या वर्षी कामासाठी घर सोडले होते. जवळपास 10 वर्षे ती मुंबईत एका ठिकाणी राहिली. त्यामुळे सईने मुंबईतील घराचे नाव ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असे नाव ठेवले आहे.

सई वर्षातून केवळ सहा महिने आईसोबत असते किंवा कधीकधी त्यापेक्षाही कमी वेळ तिला आईसोबत घालवायला मिळतो. याविषयी बोलताना सई एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, ‘आमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. पण आम्ही फार एकमेकींसोबत राहात नाही. मी आम्हा दोघींना तलवारीची उपमा देईन. जशा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसेच आम्ही दोघी एकाच घरात एकत्र राहू शकत नाही. आम्ही सहा महिने एकत्र राहातो आणि सहा महिने वेगळे राहातो. पण या तलवारींनी लढलेल्या लढाया आणि तो प्रवास आज ही माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. मी अनेक लढाया जिंकून इथपर्यंत पोहोचली आहे.’