टीम AM : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता. यामध्ये चकलांबा येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीज कोसळून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर [वय 45] लन्का हरिभाऊ नजन [वय 52] तर शालनबाई शेषेराव नजन [वय 65] असं या वीज पडून मयत झालेल्या तीन महिलांची नावं आहेत. या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता वीज कोसळली आणि यात त्यांचा जाग्यावरचं मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या तिन्ही महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर [वय 65] या गंभीर जखमी असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.