टीम AM : मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच पुढील चार तास राज्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहेत. पुढील चार तासात राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात पुढील 4 तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, संभाजीनगर, जालना, बीड धाराशीव, हिंगोली, लातूर आणि परभणी या भागात पुढील चार तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बऱ्याच भागात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.