बी – बियाण्यांची चढ्या भावानं विक्री : ‘या’ नंबरवर करा तक्रार, होणार कारवाई

टीम AM : खरीप हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात कुठेही बी – बियाण्यांची चढ्या भावानं विक्री अथवा बोगस वाणांची विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती केली जात असल्यास शेतकऱ्यांना त्याविरुद्ध तक्रार नोंदवता यावी, यासाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. 

संग्रहित छायाचित्र

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यानुसार कृषी विभागाकडून 98 22 44 66 55 हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. यावर तक्रार नोंदवणाऱ्याचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल, अशा स्वरुपाच्या तक्रारी दुकानाचं नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह, दिलेल्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.