टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ आहे किंग कोब्रा या सापाचा. जो पाहिल्यानंतर साप किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अंगाचा थरकाप उडवणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत एक भला मोठा किंग कोब्रा आपल्या तोंडातून चक्क तीन साप बाहेर काढताना दिसतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाने एकाच वेळी तीन विषारी साप गिळले होते. मात्र, काही वेळ तो रस्त्यावर येतो आणि तीनही साप एक एक करून तोंडावाटे बाहेर काढू लागतो. एकाचवेळी तीन साप गिळल्याने तो अस्वस्थ झाला होता. पोट सापांनी भरले, ज्यामुळे त्याला उलट्या होत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. उलट्या होत असताना किंग कोब्रा हळू हळू मागे सरकत तोंडातून एक एक करून तीन साप बाहेर काढतो, हे दृश्य फारच भयानक दिसत होते.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘किंग कोब्रा इतर तीन सापांना बाहेर काढत आहे, जेव्हा तो अत्यंत तणावग्रस्त असतो तेव्हा असे घडते. आशा आहे की, त्याला सुरक्षित ठिकाणी नेले गेले असेल.’ हा व्हिडीओ आतापर्यंत 47 लाख लोकांनी पाहिला आहे आणि 14 हजार लोकांनी लाइक केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत आणि अनेकांनी किंग कोब्राशी संबंधित इतर व्हिडीओही शेअर केले आहेत.