पंढरपुरात 2 जूनपासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू

टीम AM : पंढरपूर इथं येत्या 2 जून पासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतल्याचं, समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं.

मंदिरातील गाभाऱ्याच्या संवर्धन कामासाठी 15 मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे. या काळात मुखदर्शनही दिवसातून फक्त पाच तास सुरू आहे. आता मंदिर संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे 2 जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आणि संपूर्ण दर्शन व्यवस्था पूर्ववत होणार आहे. 

येत्या 7 जुलैपासून विठ्ठलाचे आषाढीसाठी 24 तास दर्शन सुरू असणार, अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीनं दिली आहे.