शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’ : यंदा मान्सूनचं वेळेवर आगमन, वाचा… 

टीम AM : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील मान्सून वेळेवर दाखल होणार असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने म्हणजे 11 जून रोजी दाखल झाला होता. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता. तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पहावं लागेल.