टीम AM : माहेरी गेलेल्या पत्नीला परत घरी आणावयास गेलेल्या अजीम शेख या युवकाचा बस व मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दिनांक 17 मे शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील सदर बाजार परिसरातील रहिवासी असलेला व सध्या चनई येथे वास्तव्यास असलेला मिलिया शाळेतील स्कुल बसचा चालक अजीम हज्जू शेख हा युवक पाटोदा येथे माहेरी गेलेल्या पत्नीस आणावयास दुचाकीवरून जात होता. मात्र, पाटोदा येथे पोहचण्यापूर्वीच गावच्या पंधरा किलोमीटर अलीकडेच भिवंडी – अहमदपूर (MH-13 CU7896) या गाडीची आणि त्याच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत सदरिल युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.