मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड : जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

टीम AM : सध्याच्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून विकी कौशल ओळखला जातो. त्याने अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसते. आज 16 मे रोजी विकी कौशलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

आज विकी जरी कोट्यवधी रुपयांचा मालक असला तरी त्याचा जन्म हा मुंबईतील एका छोट्या चाळीत झाला आहे. त्याच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण विकीने कधीही हार मानली नाही. तो सतत मेहनत करत राहिला. आज विकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे.

स्टंट दिग्दर्शक म्हणून यश मिळवण्यापूर्वी विकीच्या वडिलांना अनेक वर्षे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत. अभिनय क्षेत्र निवडण्याविषयी बोलताना विकी कौशलने सांगितले होते की, जेव्हा त्याने त्याच्या आई – वडिलांना अभिनयाची आवड सांगितली, तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झाले. परंतू, त्याच्या वडिलांनी लगेचच त्याला अभिनेता बनण्याची परवानगी दिली होती. पण काम मिळवण्यासाठी कधीही माझ्या नावाचा वापर करायचा नाही, अशी तंबीही वडिलांनी दिली होती.

विकी कौशलने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. विकी करिअरसाठी पर्याय शोधत असताना त्याला पदवी शिक्षणानंतर दूरसंचार अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. पण, त्याला अभिनयात जास्त रस होता. मात्र, अभिनेता होण्यासाठीही त्याला अनेक नकारांना देखील सामोरे जावे लागले. त्याने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘संजू’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या संजय दत्तच्या मित्राची अर्थात ‘कमली’ ची भूमिका विशेष गाजली होती. यानंतर विकीचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट तुफान हिट झाला. नंतर विकीने कतरिना कैफ सोबत लग्न केले.