पोलिस वाहनाची धडक : दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोखंडी सावरगाव टी – पॉईंटजवळ झाला अपघात 

टीम AM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी अंबाजोगाईत होणाऱ्या सभेच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिस जीपने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अंबाजोगाई तालुक्‍यातील लोखंडी सावरगाव टी – पॉईंटजवळ हा अपघात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. 

अंबाजोगाईतील मोदींच्या सभेसाठी पोलिस जीप [एमएच 23, एफ 0019] ही रविवारी अंबाजोगाईकडे जात होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या भरधाव जीपने लोखंडी सावरगाव येथील टी – पॉईंटजवळ दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत महादेव पवार [रा. गिरवली] या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जीपचेही मोठे नुकसान झाले असून तीन पोलिसही जखमी झाले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.