सोनवणेंना वाढता पाठिंबा म्हणजे शेतकरी, सामान्य माणसाने निवडणूक हाती घेतल्याचे चित्र
टीम AM : बीड जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांकडून शेतकर्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्यास वारवांर टाळाटाळ केली जाते. स्थानिक शेतकर्यांचा ऊस घेण्याऐवजी बाहेर राज्यातून ऊसाची आवक जिल्ह्यातील कारखाने करत असताना बीड लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 2011 मध्ये येडेश्वरी साखर कारखान्याचे भुमिपुजन केले आणि बघता बघता कारखाना उभा राहिला. शेतकर्यांच्या प्रश्नांची कायम जाणिव असणार्या सोनवणेंनी आपला कारखाना शेतकर्यांच्या पाठिशी उभा केला. जिल्ह्यातील कारखान्यांकडून ऊसाला योग्य भाव मिळत नसताना बजरंग सोनवणे यांनी दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यातील ऊसाला सर्वाधिक भाव दिला. यामुळे बजरंग सोनवणे हेच खरे शेतकरीपुत्र असल्याचे दिसून येते.
एकीकडे उन्हाच्या तीव्रतेने वातावरण उष्ण होत आहे तर दुसरकीडे बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरणही ढवळून निघत आहे. सामान्य माणसांसोबत त्यांनी जोडलेली नाळ पाहून बजरंग सोनवणे यांना जिल्हाभरात मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदाही शेतकरी पुत्र विरुध्द धनशक्ती अशी लढत होत आहे. विरोधकांकडून जातीय राजकारण करुन सोनवणे यांचा एकतर्फी उल्लेख करत प्रचार होत असताना सोनवणे मात्र जातीवादावर प्रचार न करता विकासात्मक मुद्यांवर प्रचार करत आहेत. स्वत:च्या हिंमतीवर शेतकर्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव देणे आणि पारदर्शक कारभार या जोेरावर शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याच शेतकरी पुत्राने अवघ्या नऊ महिन्यात येडेश्वरी साखर कारखान्याची उभारणी केली. सुरुवातीला ऊसाच्या प्रश्नापासून आर्थिक अडचणींवर मात करत कारखाना सुरु केला. आज येडेश्वरी बीड जिल्ह्यात सर्वाधिक उसाला भाव देणारा कारखाना म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून बहुमान मिळवत आहे. शेतकरी पुत्राचा कारखाना, रोख व पारदर्शक व्यवहार यामुळे शेतकऱ्यांची येडेश्वरीला पहिली पसंती आहे. वडवणी, धारुर, केज, अंबाजोगाई, परळी या भागातील ऊसासह बीड, गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांनाही येडेश्वरीचा आधार मिळत आहे. सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून बजरंग सोनवणे यांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनात केलेले प्रामाणिक कार्य आज त्यांच्या कामाला आले आहे. त्यांनी शेतकर्यांना दिलेला विश्वास यामुळे शेतकरी व सामान्य माणूस आज बजरंग सोनवणे यांच्या पाठिशी उभा आहे.
दरम्यान येडेश्वरीकडून 4 ऑगस्ट 2021 रोजी चिपळूण तालुक्यातील चिपळूण, कोलकेवाडी, वडारवस्ती, कळमबसते या गावातील पूरग्रस्त कुटूंबांना 15 दिवस पुरेल अशा जीवनावश्यक किराणा किटचे 125 गरजू पूरग्रस्त कुटूंबांना वाटप करण्यात आले. सामान्य माणसापासून शेतकर्यांपर्यंत सर्व प्रश्नांची जाण असलेल्या या शेतकरी पुत्राचा आवाज यंदा लोकसभेत घुमणार हे स्पष्ट आहे.
शेतकरी, सामान्य माणसाने हाती घेतली निवडणूक
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. पवार यांनी दाखवलेला विश्वास बजरंग सोनवणे यांनी सार्थ ठरवत तब्बल पाच लाखापेक्षा अधिकची मते घेवून काट्याची टक्कर दिली. 2019 मध्ये सोनवणेंचा पराभव झाला असला तरी सामान्य माणसाला उमेदवारी दिल्यानंतर जनता कशापद्धतीने साथ देते हे अवघ्या राज्याने पाहिले. आताही शेतकरीपुत्र विरुध्द धनशक्ती निवडणूक होत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात पुन्हा एकदा शरद पवारांनी शेतकरी पुत्र असलेला, जमिनीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याचे मतदार बोलू लागला आहे. बजरंग सोनवणे यांना जिल्हाभरात मिळत असलेला प्रतिसाद पाहून यंदाची निवडणूक आता शेतकरी आणि सामान्य माणसाने हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.