टीम AM : अंबाजोगाई शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसागणिक चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरात अजून एक चोरीच्या घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’ मशीनचं लंपास केले आहे. ही घटना शनिवारी 4 मे ला मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात ‘इंडिया 1’ कंपनीचे खाजगी ‘एटीएम’ आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या ‘एटीएम’ वर दरोडा घालत चक्क ‘एटीएम’ मशीनचं लंपास केले आहे. दरम्यान, या ‘एटीएम’ मध्ये संबंधित बॅंकेची किती कॅश होती ? ते अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.