लोकसभा निवडणूक : मतदान करताना व्हिडिओ शूट, गुन्हा दाखल, ‘या’ ठिकाणी घडली घटना

टीम AM : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड लोकसभेच्या निवडणूकीत मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर प्रसार करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध नांदेडमध्ये आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नांदेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तरोडा आणि अन्य एका मतदान केंद्रावर मतदान करतांना हे शूट झाल्याच्या तक्रारी वजिराबाद पोलिस ठाणे आणि विमानतळ पोलिस ठाण्यात करण्यात आल्या होत्या, त्यानुसार कारवाई केल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.