टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे शरद पवार आज दिवसभर बारामतीत मोदी बागेत विश्रांती करण्यासाठी थांबले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान आहे. त्यामुळे शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याची सूचना दिली असताना ते घरुन कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. यानंतर आता शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे.
शरद पवार यांचे तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर
रोहित पवार यांनी शरद पवार यांचे तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. शरद पवार 8 मे ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची श्रीगोंदा येथे सभा होणार आहे. तसेच त्यांची याच दिवशी शिरुर येथेही सभा होणार आहे. यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदनगर येथे सभा होणार आहे.
शरद पवार यांची 9 मे ला सातारा येथे सभा होणार आहे. याच दिवशी त्यांची संध्याकाळी अंबाजोगाई येथे सभा पार पडणार आहे. शरद पवार 10 मे ला पुण्यात येणार आहेत. या दिवशी वडगाव शेरी येथे सभा पार पडणार आहे. तसेच संध्याकाळी चाकण येथे त्यांची सभा पार पडणार आहे.