‘आप की कसम’ : पुन्हा – पुन्हा पाहिला गेलेला रोमॅन्टीक नाट्यमय चित्रपट

टीम AM : म्युझिकल सुपरहिट ‘आप की कसम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास 49 वर्षे आज पूर्ण झाली. ‘जय जय शिव शंकर’, ‘करवटे बदलती रहे’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘पास नही आना’, ‘सुनो कहो क्या कहा’, ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है’ अशी सगळीच गाणी आजही लोकप्रिय असलेल्या जे. ओमप्रकाश निर्मित आणि दिग्दर्शित ‘आप की कसम’ 3 मे 1974 रोजी रिलीज झाला. त्याच्या प्रदर्शनास आज 49 वर्षे पूर्ण झाली.

राजेश खन्नाच्या सुपरहिट चित्रपटापैकी हा एक पुन्हा – पुन्हा पाहिला गेलेला रोमॅन्टीक नाट्यमय चित्रपट आहे. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ येथे या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटाची पटकथा राम केळकर आणि रमेश पंत यांची आहे. तर आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत आहे. 

या चित्रपटात संजीवकुमार, राजेश खन्ना, मुमताज आणि रहेमान यांच्या दर्जेदार अभिनयाचे रंग पाह्यला मिळतात. त्याशिवाय दीना पाठक, रणजित, असरानी, जयश्री टी., ए. के. हनगल, रुबी सुलोचना, सत्येन कप्पू, केश्तो मुखर्जी, सुंदर, मुराद यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण व्ही. बाबासाहेब यांचे तर संकलन प्रताप दवे यांचे आहे. 

शब्दांकन : संजीव वेलणकर