आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला ‘परंपरा’ चित्रपट 26 एप्रिलला होणार प्रदर्शित

टीम AM : हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘परंपरा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. 

मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्या भूमिका चित्रपटात आहेत.  

पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना आनंद मेनन यांचे संगीत आहे. श्रीकांत तेलंग यांचे संकलन तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.