खळबळजनक :  प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांची आत्महत्या

टीम AM : अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खाजगी बी.एड. कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेजमध्येचं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरात बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बी. एड. कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी [ वय – 45] कार्यरत होते. आज बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी कॉलेजमध्येचं कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.