टीम AM : अंबाजोगाई – लातूर महामार्गावर असलेल्या सायगाव जवळ अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात दिनांक 24 एप्रिल बुधवार रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, सायगाव जवळ बस आणि मोटारसायकलचा अपघात झाला असून या अपघातात अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा येथील रहिवासी असलेला युवक शेख खलील दादामिया याचा जागीच मृत्यु झाला आहे. अंबाजोगाई शहरातील विट उद्योजक शेख दादामिया पाशा यांचा शेख खलील हा मुलगा होता. या घटनेमुळे पेन्शनपुरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करित आहेत.