धनगर आरक्षणाला धक्का : सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निकाल, वाचा… 

टीम AM : धनगर आरक्षणाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाची आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. 

धनगर आणि धनगड हा शब्द सारखा आहे, त्यामुळे धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता, हा निकाल सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला आहे.

धनगर समाजाला ‘ओबीसी’ मधून आरक्षण मिळत आहे, पण ‘एसटी’ मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाने आंदोलनंही केली. दुसरीकडे धनगर समाजाला ‘एसटी’ मधून आरक्षण द्यायला आदिवासी समाजाकडूनही विरोध झाला. अखेर ही लढाई कोर्टात गेली, मुंबई हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही धनगर समाजाला ‘एसटी’ मधून आरक्षण द्यायची याचिका फेटाळून लावली आहे.