हातमाग – वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

टीम AM : भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2024 – 25 या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ [ओडीशा] करीता 13 जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता 3 जागा [1 जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरीता] पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई व औरंगाबाद मार्फत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज 10 जून 2024 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

इच्छूक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज  10 जून 2024 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनूषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.