टीम AM : अंबाजोगाई येथील विजय बेले यांच्यासह दोन जण तरुण देवदर्शनासाठी, पर्यटनासाठी लदाखला गेले होते. दरम्यान, त्या ठिकाणी जोगीला पास येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने त्या परिसरातील रस्ते ब्लॉक झाले होते. त्यामुळे गेल्या चार – पाच दिवसांपासून येथील विजय बेले व त्यांचे सहकारी त्या परिसरात अडकले होते, अशी माहिती समोर आली होती.
परंतू, लदाख येथे विजय बेले आणि त्यांचे सहकारी सुखरूप आहेत, अशी माहिती खुद्द विजय बेले यांनी समाजमाध्यमांच्याद्वारे दिली आहे. बर्फवृष्टीमुळे ब्लॉक झालेले रस्ते प्रशासनाने सुरळीत चालू केले असून लवकरच आम्ही ‘त्या’ ठिकाणावरून सुखरूप बाहेर पडणार आहोत, अशी माहिती विजय बेले यांनी दिली आहे. येत्या तीन – चार दिवसांत ते अंबाजोगाई शहरात परत येतील, अशी माहिती विजय बेले यांच्या मित्रपरिवाराने दिली आहे.