‘मिस्टर इंडिया’ ची ‘टीना’ आठवतेय का ? 37 वर्षांनंतर दिसते अशी, तुम्हीही व्हाल थक्क ! वाचा… 

टीम AM : अभिनेते अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट आजसुद्धा अनेकांचा लोकप्रिय आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात बऱ्याच लहान मुलांनीदेखील भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी ‘टीना’ ची भूमिका साकारणाऱ्या चिमुकलीच्या निरागस अभिनयावर प्रेक्षक फिदा झाले होते. चित्रपटात त्या टीनाचा बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. ही भूमिका साकारणाऱ्या मुलीचं नाव हुजान खोदाइजी असं आहे. हुजान आता मोठी झाल्यानंतर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी तिला ओळखूच शकले नाहीत.

हुजानचा इन्स्टाग्रामवर अकाऊंट तर आहे, मात्र तिने तिचं प्रोफाइल प्रायव्हेट ठेवलंय. म्हणजेच तिने फॉलोची विनंती स्विकारल्याशिवाय कोणीही तिच्या अकाऊंटवरील पोस्ट पाहू शकत नाही. तरीसुद्धा सोशल मीडियावर हुजानचे काही ठराविक फोटो व्हायरल झाले आहेत. हुजानचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. तिचे फोटो पाहिल्यानंतर ही ‘मिस्टर इंडिया’ मधील तीच चिमुकली आहे का, असा प्रश्न पडतो.

‘मिस्टर इंडिया’ नंतर हुजान दुसऱ्या कोणत्या चित्रपटांमध्ये झळकली नाही. मात्र ती सध्या मार्केटिंग क्षेत्रात काम करत असल्याचं कळतंय. लिंटास नावाच्या एका कंपनीत ती ॲडव्हर्टायजिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतेय. ‘मिस्टर इंडिया’ मध्ये चिमुकल्या टीनाची भूमिका साकारणारी हुजान आता 43 वर्षांची झाली आहे. सहा वर्षांची असताना तिने या चित्रपटात भूमिका साकारली होती. हुजानचं लग्न झालं असून तिला दोन मुलीसुद्धा आहेत.

‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाची निर्मिती केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेलदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी याबाबतची घोषणा केली होती.