पुन्हा तीन दिवस मुसळधार पाऊस बरसणार : हवामान विभागाचा अंदाज

टीम AM : राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात ताशी 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.

दरम्यान, मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशीव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळं गहू, ज्वारी, मका, हळद, भाजीपाल्यांसह फळबागांचं नुकसान झालं आहे. 

अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं त्वरीत पंचनामे करुन मदतीचं आवाहन शेतकरी वर्गातून केलं जात आहे.