मराठवाड्यात ‘त्या’ योजनेत आर्थिक अपहार : कारवाई होणार

टीम AM : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळवणं आणि रुग्णालय अंगीकृत या दोन्ही प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क असल्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं आहे.

सन 2022 पासून या कक्षातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अवघ्या 1 वर्ष 8 महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल 213 कोटी रुपयांहून अधिकचं अर्थसहाय्य गरजू रुग्णांना वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यातल्या काही भागात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतून गरजूंना आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी काही दुष्टप्रवृत्ती आर्थिक अपहार करत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून कक्षाला प्राप्त होत आहे. या माहितीमध्ये सत्य आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं चिवटे यांनी सांगितलं.