टीम AM : राज्यातील तापमानात दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळं अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांना वाढत्या उष्णतेचा त्रास होत असून, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानात किंवा उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सुचना जारी केल्यात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
उष्माघातापासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या सूचना
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नेमक्या काय आहेत सचना त्याबद्दलची माहिती पाहुयातय
◾ तुम्हाला तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या.
◾ दिवसाच्या सर्वात जास्त उष्णता असलेल्या वेळेत (सामान्यत: सकाळी उशिरा ते संध्याकाळ) म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा.
◾ कापसासारख्या कपड्यांपासून बनवलेले हलके, सैल कपडे घाला. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.
◾ घराबाहेरील, विशेषत : दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत (सामान्यत : सकाळी उशिरा ते संध्याकाळ) कामे कमी करण्याचा प्रयत्न करा.
◾ तुमच्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी रुंद टोपी आणि सनग्लासेस घाला.
◾ मुले, वृद्ध कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवा, कारण त्यांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
उष्माघाताची लक्षणे कोणती ?
◾ अती घाम येणे
◾अशक्तपणा येणे
◾ चक्कर येणे
◾ मळमळ होणे
ही लक्षणे तुम्हाला किंवा इतर कोणाला आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळं राज्य सरकारनं काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
काय काळजी घ्यावी ?
तुमच्याकडे वातानुकूलन (एयर कंडिशनर) नसेल, तर हवा खेळती राहण्यासाठी पंखे वापरा आणि तुमची राहण्याची जागा थंड करा. स्थानिक हवामान अंदाज आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या तापमानासंबंधीच्या सूचनांकडे लक्ष द्या. दिवसाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या वेळेत सामाजिक मेळावे घेणे टाळा.