टीम AM : भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडे या केज दौऱ्यावर असता त्यांनी स्वामी समर्थ मठात दर्शन घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पंकजा मुंडे यांचा संगीता ठोंबरे आणि डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी जंगी सत्कार केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, माजी आमदार संगीता ठोंबरे या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळे केज मतदारसंघाचे राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत माजी आमदार संगीता ठोंबरे यांची पुन्हा राजकीय सक्रियता पहायला मिळणार असून केज मतदारसंघात प्रचार करून पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय संगीता ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा कुटु़ंबावर नाराजी वाढत असतानाच माजी आमदार संगीता ठोंबरे राजकरणात सक्रिय होत असताना पहायला मिळत आहे. यामुळे भविष्यात केज विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष या मतदारसंघात पहायला मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. संगीता ठोंबरे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय झाल्यापासून मुंदडा विरोधी राजकीय मंडळींनी पुन्हा संगीता ठोंबरे यांच्याकडे लक्ष वेधले आहे.