टीम AM : अंबाजोगाई शहरात आज पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदरील घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली आणि माहिती जाणून घेतली.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरात ‘स्वाराती’ रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुकुंदराज शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये ‘दानिश’ कलेक्शन हे कपड्याचे दुकान आहे. आज दिनांक 26 मार्च रोजी पहाटे 4 ते 4:30 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत रमझान सणानिमित्त विकण्यासाठी आणलेले लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. आगीत तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती दुकान मालिक वाजेद पटेल यांनी दिली आहे.