पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश : आदेश जारी, वाचा… 

टीम AM : राज्यात येत्या शैक्षणिक सत्रात पहिली ते आठवीच्या, 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. यात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काउट गाईडचा गणवेश असेल. 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून याबाबतचा ‘कार्यारंभ’ आदेश देण्यात आला असून बचत गटातील महिलांकडून हे गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी लागणारं ठराविक माप महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवलं जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना 110 रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.