प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ भूमिकेचे जोरदार स्वागत : शाहू महाराजांनी मानले आभार

टीम AM : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत असून, ‘वंचित’ च्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठींबा त्यांना दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शाहू महाराज यांनी मानले आभार

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना दिलेल्या पाठिंब्याचे शाहू महाराज यांनी X वर पोस्ट करत आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.