टीम AM : केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेले सोनवणे यापूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे म्हणून परिचित होते.
2019 ची बीड लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. तत्कालीन भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात सोनवणे यांना पाच लाखापेक्षा अधिक मतदान मिळाले होते. दरम्यान, सोनवणे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून आगामी बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.