टीम AM : मुंबईतून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील मंत्रालय इमारतीत सोमवारी एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
इमारतीच्या आत लावलेल्या सुरक्षा जाळ्यांमुळे तो बचावला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरक्षा जाळीमध्ये तो माणूस ‘भारत माता की जय’ म्हणताना ऐकू येत आहे.
अहवालानुसार, ही व्यक्ती वडापाव विक्रेता असून त्याच्या स्टॉलवर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचेही वृत्त आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.