वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे : डॉ. पराग संचेती

टीम AM : सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला हाडांचे आजार हा सर्वच कुटुंबात जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात. वय वाढताना या समस्या वाढू नयेत, यासाठी लवकर काळजी घेतली, तर हे आजार टाळता येणे शक्य आहे. विशेषतः मनके व गुडघ्यांच्या समस्या असतात. हाडांच्या आजारांबाबत पुण्यातील ‘संचेती’ हॉस्पिटल केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. सध्या हॉस्पिटलच्या अत्याधुनिक अश्या नवीन ग्रीन, स्मार्ट आणि हाय टेक 12 मजली इमारतीचे काम पूर्ण होत आलेले असून त्यामध्ये 3 मजले भूमीगत पार्किंगसाठी राखीव आहेत. ऑर्थो, स्पाइन, न्युरोसर्जरी, रोबोटिक गुडघे आणि खुबा रोपण आणि रोबोटिक ओआर्म स्पाइन सर्जरी यासह 8 हायटेक ऑपरेशन थिएटर असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य ठेवून आम्ही कार्यरत आहोत, यापुढेही कार्यरत राहू, असे प्रतिपादन ‘संचेती’ हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी केले. 

अंबाजोगाई शहरातील हॉटेल पियुष इन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पराग संचेती यांनी ‘संचेती’ हॉस्पिटल बद्दल विस्तृत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला डॉ. नवनाथ घुगे, डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती. 

पाठीच्या शस्त्रक्रियेच्या मानसिक भीतीपासून मुक्त होणे अत्यावश्यक आहे. कदाचित माहित नसेल, परंतू बहुतेक सामान्य मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये पाठीचा कणा समाविष्ट नसतो. आजची अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे, इमेजिंग उपकरणे आणि मॉनिटरिंग उपकरणे सर्जनला मणक्यामध्ये अभूतपूर्व प्रवेश आणि दृश्ये प्रदान करतात, ज्यामुळे मणक्याची शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होते. पाठदुखी टाळण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनशैलीतील बदलांबद्दलची भीती दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

कोविड – 19 मुळे घरातून दीर्घकाळ काम केल्यामुळे अनेक लोकांमध्ये मणक्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हे अत्यावश्यक आहे की, आपण आपल्या शरीराने दिलेली चिन्हे समजून घेणे आणि समस्या वाढण्यापूर्वी सुधारात्मक कृती सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पाठीच्या दुखण्यावर बराच काळ उपचार न केल्यास स्पाइनल स्टेनोसिस सारख्या परिस्थिती विकसित होतात. वारंवार पाठदुखीसाठी इतर अनेक घटक जबाबदार आहेत, असे प्रतिपादन ‘संचेती’ हॉस्पिटलचे प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ डॉ. संदीप जावळे यांनी केले

एक बोन बॅंक हे जीवित किव्हा जीवितहानी झालेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या हाडांचा साठा असतो. रक्तबँक जसे रक्ताची कमी असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करते, तसेच बोनची (हाड) गरज असताना हाडाचा पुरवठा करण्यात सक्षम असते. ‘संचेती’ रुग्णालयाचे चेअरमन डॉ. पराग संचेती यांच्या नेतृत्वाखाली या बोन बॅंकेची सुरुवात करण्यात आली आहे. या बोन बॅंकेचे प्रमुख डॉ. पराग संचेती आहेत.

◾ हाडांची कमतरता भरून काढण्यासाठी अशा बॅंकेतील हाडे अत्यंत उपयुक्त ठरतात.

◾ हाडांच्या वित्रांमुळे होणाऱ्या अपंगत्वावर मात करण्यास मदत होते.

◾ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यास मदत होते.

ही संकल्पना महाराष्ट्रातील ‘संचेती’ रुग्णालयात सुरू करण्यात आली असून ती अनोखी आहे. यामुळे बऱ्याच रुग्णांना फायदा होईल. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक सोई हे ‘संचेती’ हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे. 

मोफत शिबीराचं उद्घाटन

‘संचेती’ हॉस्पिटलच्या मोफत शिबिराचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत झाले. अंबाजोगाई शहरातील 600 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, असे डॉ. एन. बी. घुगे यांनी सांगितले. 

डॉ. दिपक लामतुरे म्हणाले की, हाडांचे आजार आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये आणि कोविड -19 नंतर खूपच वाढले आहेत. अशातच डॉ. पराग संचेती आणि त्यांच्या टीमने अंबाजोगाई शहरांमध्ये मोफत शिबिराचे आयोजन करून अंबाजोगाई वासियांना या संधीचा लाभ मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.