टीम AM : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशीतले चोर’ या चित्रपटातील ‘साला कॅरेक्टर’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या आवाजातील या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे संगीत आहे.
मस्तीने भरलेल्या या गाण्यात ‘चाळीशी’ तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणंं आहे.
चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता. ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या अवलियांनी न्याय दिलाय.