टीम AM : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर केला आहे. आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी कळविली आहे.
जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहेत, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी, असेही आदेशीत केले असून हे आदेश आज शनिवार दिनांक 16 मार्च 2024 पासून लागू होतील.