पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी ? : ‘एनडीए’ चा नवा फॉर्म्युला ?

टीम AM : लोकसभा निवडणूकीची केंव्हाही घोषणा होऊ शकते. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. अशातच भाजपाच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने प्लान तयार केला आहे. पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

40 टक्के खासदारांचे तिकीट कापणार

भाजप महाराष्ट्रातील जवळपास 40 टक्के विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपने तयारी केली आहे.

काय आहे ‘एनडीए’ चा नवा फॉर्म्युला ?

भाजप – 32, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 4 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे, अशीही माहिती समोर येत आहे. 

महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 प्लस

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचे भाजपचे टार्गेट आहे. विशेष म्हणजे भाजपने त्यादृष्टीने नियोजन देखील केले आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरु असून लवकरच महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.