मोदी सरकारचं गिफ्ट : घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट

टीम AM : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल’. असे ट्विट मध्ये म्हणटले आहे.