टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक धक्कादायक व्हिडिओ ही असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मद्यपी शिक्षकाने शर्टाच्या खिशात चक्क शाळेत दारूची बॉटल आणल्याचे दिसत आहे.
व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की, हा शिक्षक शाळेतील शिक्षकांच्या कक्षेत जातो आणि टेबलासमोर बसतो. टेबलावर दारूची आणि पाण्याची बाटली ठेवतो आणि बाटलीत दारू आणि पाणी ओततो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जणांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
Sudhir Mishra या ‘एक्स’ अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘शिक्षकाला कामावरून काढेपर्यंत ही पोस्ट रिपोस्ट करा, शाळेत दारू पिऊन येत हा शिक्षक मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर मधील शाळेतील ही घटना आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘हा शिक्षक विद्येचे मंदिर दुषित करतोय. मुलांचा हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी.’ तर एका युजरने लिहिलेय, ‘अतिशय लज्जास्पद’, आणखी एका युजरने लिहिलेय, ‘अशा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होईल ? अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.